मुंबई : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत सातव्या हप्त्याचे वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत राज्यातील तब्बल ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये जमा करण्यात आले.
मंत्रालयात कृषी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात हा निधी पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचे आर्थिक बळकटीकरण होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





