Thursday, July 9, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

धुळखात पडलेल्या नव्या ट्रॅक्टरवर बसून नगरसेवक विवेक बोढे यांचा निषेध;

नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस नगर परिषदेने सार्वजनिक निधीतून खरेदी केलेले नवीन ट्रॅक्टर गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या टाकीजवळ निष्क्रिय अवस्थेत धुळखात पडून असल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक विवेक बोढे यांनी अनोख्या पद्धतीने नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला. त्यांनी थेट धुळखात पडलेल्या ट्रॅक्टरवर बसून प्रशासनाचे लक्ष वेधत निष्काळजी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.

नगरसेवक विवेक बोढे यांनी सांगितले की, नगर परिषद निवडणूक होऊन सुमारे सहा महिने उलटले असतानाही हे नवीन ट्रॅक्टर अद्याप सेवेत आणण्यात आलेले नाहीत. पाण्याच्या टाकीजवळ उभे असलेले ट्रॅक्टर धूळ खात असून त्यातील काही लोखंडी साहित्य चोरीस गेल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक बाब समोर आणली. ट्रॅक्टरची चावी अजूनही वाहनालाच लटकलेली असून ती गंजलेली आहे. लाखो रुपयांची सार्वजनिक मालमत्ता अशा प्रकारे उघड्यावर निष्काळजीपणे पडून असल्यामुळे तिचे नुकसान होत असून नगर परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

नगरसेवक विवेक बोढे यांनी नगर परिषद प्रशासनाने तातडीने संबंधित ट्रॅक्टरची पाहणी करून ते सेवेत आणावेत, तसेच सार्वजनिक निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचा योग्य वापर करून नागरिकांना त्याचा लाभ मिळेल यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणाबाबत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच इतर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया किंवा माहिती प्राप्त होऊ शकली नव्हती. त्यांच्या भूमिकेनंतर या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News