मुंबई: मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२६ मधील OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी (Waiting List) अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याने अनेक पात्र व गुणवंत उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतींनी कठोर परिश्रम करूनही केवळ प्रशासकीय विलंबामुळे नियुक्तीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी तातडीने जाहीर करण्यात यावी, तसेच पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी राज्यातील गुणवंत युवक-युवतींना न्याय मिळावा, त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळावे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधींना विलंब होऊ नये, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
OBC प्रवर्गातील पात्र उमेदवारांना न्याय मिळावा आणि भरती प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी हा पाठपुरावा पुढील काळातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.




