Wednesday, July 8, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपुरात 10 जुलै रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; 39 हून अधिक पदांसाठी भरतीची संधी

चंद्रपूर : जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदविका, पदवी तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे होणार आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 39 हून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यात श्रीराम फायनान्स, चंद्रपूर येथे बिझनेस असोसिएटअप्रेंटिसशिप पदांसाठी, क्राईस्ट हॉस्पिटल, चंद्रपूर येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत स्टाफ नर्सटेक्निशियन पदांसाठी, तसेच सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहताना आधारकार्ड, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि रिझ्युमेच्या किमान दोन प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News