मुंबई : मुंबई उपनगरातील विकास आराखड्यातील आरक्षणासंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत काही ठिकाणी बनावट नकाशे तयार केल्याचा अहवाल समोर आला आहे. या प्रकरणी शासनाने फेरविचार करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले.
त्यांनी सांगितले की, विकास आराखड्याशी संबंधित नकाशांमध्ये फेरफार होणे गंभीर बाब असून यामुळे शासकीय कामकाजावर आणि सामान्य जनतेच्या विश्वासावर परिणाम होतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी शेलार यांनी प्रशासनाला पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करण्याचेही आवाहन केले.





