Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मुंबई : महाराष्ट्र-आयोवा भागीदारीमुळे सहकार्याची नवी दारे उघडणार – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र आणि अमेरिकेतील आयोवा राज्य यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारामुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा आणि तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईतील ताज पॅलेस हॉटेल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या वेळी दोन्ही राज्यांचे वरिष्ठ अधिकारी, कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आयोवा हे कृषिप्रधान व प्रगत तंत्रज्ञान असलेले राज्य असून त्यांच्यासोबतचा हा करार महाराष्ट्राच्या शेती, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, डिजिटायझेशन, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये नवे प्रकल्प उभे राहतील.

ते म्हणाले, “याआधी महाराष्ट्राने जपान व जर्मनीसोबत सिस्टर-स्टेट करार करून व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना दिली आहे. अमेरिकेतील एखाद्या राज्यासोबतचा हा पहिलाच करार असून तो भारत-अमेरिका संबंधांना बळकट करेल.”

आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राशी भागीदारी करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. “हा करार नवोपक्रमांना चालना देणारा, आर्थिक समृद्धी वाढवणारा आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारा आहे,” असे त्या म्हणाल्या.

या कराराचे प्रमुख फायदे:

  • आधुनिक कृषी तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमता वाढणार
  • अन्नप्रक्रिया उद्योग व निर्यातीत वाढ
  • डिजिटल गव्हर्नन्स आणि ई-सेवा मजबूत होणार
  • आरोग्यसेवा प्रणालीत सुधारणा
  • कौशल्य विकासामुळे रोजगार संधी वाढणार
  • अक्षय ऊर्जा प्रकल्पांमुळे पर्यावरण संरक्षण
  • पर्यटन व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन
  • थेट गुंतवणूक आणि औद्योगिक वाढ
  • शिक्षण व संशोधन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प
  • महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वृद्धिंगत

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, “या सामंजस्य करारामुळे शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि संशोधकांसाठी नवे मार्ग खुले होतील आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळेल.”

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News