मुंबई : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल आयोजित ‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील १ दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल रमेशबैस यांच्या उपस्थितीत झाले. कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा(राज्यपाल).
राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस माजी फेलो दिवंगत डॉ.बी.के. गोयल व डॉ.एल.एच. हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. केवल तलवार, डॉ.पी.व्ही. देसाई, डॉ.बी.एस. सिंघल, डॉ. सरोज गोपाल, डॉ. अशोक गुप्ता, डॉ. देवेन तनेजा, डॉ. नादीर भरुचा, डॉ. सुनील पंड्या, डॉ. सतीश खाडिलकर, डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले.
‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील चर्चासत्राला राज्यपाल रमेश बैस यांच्या समवेत नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. शिव कुमार सरीन, नियोजित अध्यक्ष डॉ. दिगंबर बेहरा, चर्चासत्र आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश खाडिलकर, सहाध्यक्ष डॉ. अशोक गुप्ता, बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ. राजकुमार पाटील, हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. अनिल शर्मा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.




