महाराष्ट्र : राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभांची रंगीत तालीम आज घेण्यात आली. अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.




