“२९ जनवरी की शाम देश के जवानों के नाम” कार्यक्रमाने घुग्घूसमध्ये उपस्थितांना मंत्रमुग्ध केले
घुग्घूस (चंद्रपुर) : आशा किरण बहुउद्देशीय संस्था, घुग्घूसच्या वतीने २९ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात “२९ जनवरी की शाम देश के जवानों के नाम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी देशसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सैनिकांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष शरद राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिलीप पिट्टूलवार, राष्ट्रवादी नेते संजय ठाकूर, विनय बोढे, काँग्रेस नेते सय्यद अनवर, अलीम शेख, शिवसेना उबाठा नेते अमित बोरकर, तसेच संपत आरेली, विजयकुमार माटला, स्वरूप लिंगमपेली, रवी डिकोडा, शेखर तंगडपल्ली, ममता मोरे, सुजाता गिद्दे, श्रीनिवास गुडला, दिप्ती सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पणाने करण्यात आली. त्यानंतर लेझीम पथकाने जवानांना मानवंदना दिली.
जवानांचा सन्मान सोहळा
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्मी जवान नरेश बदकल, प्रमोद गावंडे, विनोद देरकर, प्रितम ठाकरे, सुशांत टिपले, संजू सुदाटी, संजय चिवंडे, विशाल बोरिकर, नितीन मांदाळे, महेश गिरडे, रोशन आत्राम, कमल सिंग, अमन पाटील, प्रकाश नगराळे, दीपक धुप्पे, संदीप टिपले, राजू डिकोडा, अशोक चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या गौरवाने जवान भारावून गेले.
संस्कृतील कार्यक्रमाने जिंकली मने
कार्यक्रमाच्या सांस्कृतिक सत्रात परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य कलाकृतींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे संचालन शंकर नागपुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रितम नागूलवार, सचिव गोविंद गोगला, सहसचिव विशाल चंदनशिवे, कोषाध्यक्ष आकाश दुर्गे, सुजाता गोगला, सुचिता आगात, जानकी कैथल, सृष्टि चिवंडे, कुणाल गेडाम, हरीश कोंडागुर्ला, प्रेमराज निचकोला, अविनाश मेश्राम, श्रीनिवास आरेली यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाने घुग्घूसच्या नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक वृद्धिंगत केली आणि जवानांसाठी एक स्नेहपूर्ण व सन्मानाचा क्षण निर्माण केला.




