घुग्घुस (चंद्रपुर) : येथील काँग्रेसचे युवा नेते व शहराध्यक्ष राजू रेड्डी यांचे समर्थक अनुप भंडारी यांनी रविवार, १५ सप्टेंबर रोजी आपल्या 137 प्रमुख कार्यकर्त्यांसह राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपात प्रवेश केला.
याप्रसंगी राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी युवा नेते अनुप भंडारी व कार्यकर्ते अजय त्रिवेणी, कविता विष्णुभक्त, एकटम्मा तग्रम, ममता उपलेटी, शकिला सखद, विजया पेरपुल्ला, अजय पचोर, अजय पानम, प्रिन्स सिलका, संजय कोटा, संतोष गणगोणी, रंगा शेट्टी, विजय कोटा, भारत कोंड्रा अशा अनेक कार्यकर्त्याच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून भाजपा पक्षात त्यांचे स्वागत केले.
रविवारला युवा नेते अनुप भंडारी यांचा वाढदिवस असल्याने आणि वाढदिवसाच्या दिवशी भाजपात प्रवेश घेतल्याने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपाचे संतोष नुने, विनोद चौधरी, अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, सुचिता लुटे, वैशाली ढवस, सुनील बाम, हेमराज बोंबले, सतीश बोन्डे, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, तुलसीदास ढवस, अमीना बेगम व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.




