चंद्रपुर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने आयोजित केलेल्या वाईल्डकॉन 2025 परिषदेचे उद्घाटन चंद्रपूर वन अकादमीत उत्साहात पार पडले. उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात शोभा फडणवीस, आजी-माजी वनाधिकारी, वन्यजीव अभ्यासक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाय” या विषयावर सखोल चर्चा झाली. उपस्थित मान्यवरांनी संवेदनशील आणि अभिनव उपाययोजना सुचवत वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मते मांडली.
ही परिषद वन्यजीव संरक्षण, मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय, तसेच पर्यावरणीय शाश्वततेसाठी महत्त्वाचे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




