घुग्घुस (चंद्रपुर): “अबुआ दिशूम अबुआ राज” (आपला देश, आपला राज) असा नारा देत भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी समाजासाठी स्वाभिमान आणि हक्कांसाठी संघर्ष करत केवळ २४ व्या वर्षी शहीद झालेले बिरसा मुंडा हे आदिवासी समाजात देवतुल्य स्थान लाभलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.
या प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, दीपक पेंदोर, सुनील पाटील, दीपक कांबळे, मनोज चांदेकर, शहंशाह शेख, निखिल पुनघंटी, आयुष आवळे, अंकुश सपाटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या विचारांना वर्तमान समाजात अधिक व्यापकपणे पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला.




