Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बदलीच्या निषेधार्थ शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध!

डॉ.प्रवीण येरमे यांच्या बदलीच्या निषेधार्थ बहुजन समाज बांधवांचा मोर्चा

जिवती : गडचांदूर शहरातील अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण येरमे यांचा राजकीय दबावात कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच केलेल्या बदलीने कोरपना, जिवती व राजुरा तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बहुजन कृती समितीच्या वतीने ५ सप्टेंबरला हजारोच्या संख्येने निषेध रॅली काढून डॉ. प्रविण येरमे यांची बदली रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात डॉ.प्रवीण येरमे यांनी समाजाला एकत्र करत असल्याने आदिवासी समाज एकत्रित आला तर त्याचा फटका आपल्याला बसेल हे गणित डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित राजकारण्यांनी डॉ.येरमे यांची बदली केल्याचा आरोप बहुजन समाज कृती समितीचे गजानन पाटील जुमनाके यांनी केला आहे. डॉ.येरमे यांची भद्रावती येथे बदली केली परंतु त्या ठिकाणी पाच वैद्यकीय अधिकारी पूर्वीपासून कार्यरत आहेत. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात येरमे सह दोनच अधिकारी कार्यरत होते. जिवती व कोरपना आदिवासी बहुल अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील रुग्णांची गैरसोय होणार नाही का? असा प्रश्न ही जुमनाके यांनी केला.

सदर निषेध मोर्चा रॅली बहुजन कृती समितीचे अध्यक्ष, युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात काढण्यात आली असून रॅलीची सुरुवात वीर बाबुराव शेडमाके चौकापासून ग्रामीण रुग्णालय पर्यंत काढण्यात आले. सदर रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने, ज्येष्ठ विचारवंत बापूरावजी मडावी, बहुजन समाज पार्टीचे विधानसभा प्रभारी पांडुरंग तुमराम, एमआयएमचे हाफिज भाई यांच्यासह हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होते.

या निषेध रॅलीला गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, भाजप व एमआयएम पक्षासह अनेक विविध सामाजिक संघटनेचे समर्थन होते.
डॉ.येरमे यांनी संविधान जागृती, आरोग्य जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम घेतले. त्याचबरोबर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन, गरोदर मातांना जनजागृती, किशोवयीन मुलींना मार्गदर्शन, नवजात बालकांचे स्वागत म्हणून पिंपळ वृक्ष मातांना दिले. जायचे, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत असे, समाज व्यवस्था संस्कृती टिकण्यास महत्त्वपूर्ण भूमिका समाजाला प्रबोधन करणे यासह मिशन ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, मिशन, पीएचडी अशा अनेक अभियान सुरू केले होते. पुष्कळ सारे मानव सेवा कार्य डॉ.येरमे यांचे आहे. यामुळे कोरपना, जिवती तालुक्यात सामाजिक भावनिक नाते जोडलेले आहेत. ही बदली तात्काळ रोखण्यात यावी अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आक्रोश निषेध रॅली काढण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News