Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस में मज़दूर की संदिग्ध मौत, हत्या की आशंका; कांग्रेस ने जांच की मांग कर दी आंदोलन की चेतावनी

घुग्घुस, चंद्रपुर : शहरातील मेटल्स कंपनीत सुरू असलेल्या मेगा प्रोजेक्ट्समुळे उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ़ आणि अन्य राज्यांतील हजारो परप्रांतीय मज़दूर येथे कामासाठी दाखल झाले आहेत. याच कंपनीतील जीडीसीएल (GDCL) या ठेकेदार कंपनीत काम करणाऱ्या एका मज़दूराचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मज़दूर लेबर कॉलनीतील प्लॉट नंबर 17 येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.

मात्र ही घटना अपघात नसून त्यामागे हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या सुमारास संबंधित मज़दूर अन्य कामगारासोबत त्या इमारतीत होता आणि त्यांच्यात वाद झाल्यानंतरच त्याला इमारतीवरून ढकलण्यात आल्याची माहिती काही मज़दूरांच्या चर्चेतून आणि सूत्रांच्या हवाल्याने पुढे आली आहे.

या घटनेचा तपास हत्या या कोनातून करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शहर अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांना निवेदन देत निष्पक्ष तपासाची मागणी केली असून, मृत मज़दूराच्या कुटुंबाला योग्य मोबदला देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जीडीसीएल कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

प्रशासन आणि कंपनीवर गंभीर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, घुग्घुस परिसरात हजारोंच्या संख्येने बाहेरून मज़दूर आणले जात आहेत, मात्र अजूनही त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले नाही. लेबर ऑफिसरकडे किंवा स्थानिक प्रशासनाकडे या मज़दूरांची अधिकृत व संपूर्ण यादीही उपलब्ध नाही.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या कंपनीच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना जिल्हाधिकारी, माजी मंत्री आणि अनेक उच्चपदस्थ अधिकारी हजेरी लावतात, मात्र कंपनीतील चुकीच्या गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.

अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, अधिकारी जर कारवाई करू शकतात, तर अद्याप ती का केली गेली नाही? सामान्य जनतेच्या मनात असलेले हे प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय निर्माण करतात.

मज़दूराचा मृत्यू अपघात होता की हत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. मज़दूरांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि त्यांना न्याय मिळावा हीच लोकांची मागणी आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News