प्रणयकुमार बंडी
घुग्घुस, चंद्रपुर : गावातील विकासकामे व प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. नवरात्रीनिमित्त 22 सप्टेंबर 2025 पासून प्रमोद महाजन रंगमंच येथे हे उपोषण सुरू झाले होते. यापूर्वी 2024 मध्ये करण्यात आलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे यावेळी आंदोलनकर्त्यांनी गंभीर पवित्रा घेतला होता.
मात्र 26 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमुख मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. तरीसुद्धा गावात व परिसरात या आंदोलनाबाबत चर्चा रंगल्या आहेत. विशेषतः 2019 च्या निवडणुकीत दिलेले 200 युनिट मोफत वीजचे आश्वासन हा चर्चेचा वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. या मुद्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असल्याची चर्चा असून, याच कारणामुळे आंदोलन शांततेत मागे घेतल्याचे बोलले जात आहे.
जनतेत हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे की, अलीकडेच एका खाजगी कंपनीच्या साहित्य वाटप कार्यक्रमास कलेक्टर साहेब उपस्थित होते, मात्र उपोषण स्थळी मात्र त्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे हे उपोषण खरंच लोकहितासाठी होते की केवळ राजकीय स्टंट, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रमुख मागण्या अशा –
महसूल विभागाच्या इमारतीला ‘दिव्यांग भवन’ घोषित करून दिव्यांग बांधवांसाठी खुली करणे.
गावातील नवीन सरकारी दवाखाना तातडीने सुरू करणे.
2019 च्या निवडणुकीतील 200 युनिट मोफत वीजचे आश्वासन पूर्ण करणे.
प्रमुख चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे.
गावातील सर्व दारू दुकाने व बार दोन किलोमीटर अंतरावर हलवणे.
गांधी चौकात महात्मा गांधी स्मारक उभारणे.
एसीसी प्रशासनाच्या फटाका मैदानावर संत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या नावाने सांस्कृतिक मंच उभारणे.
गावातील मोठा तलाव व दीक्षित तलावाचे सौंदर्यीकरण करणे.
मिरची मार्केट परिसरात महर्षी वाल्मिकी महाराजांचा पुतळा उभारून त्या चौकाला “महर्षी वाल्मिकी चौक” असे नाव देणे.
या सर्व मागण्यांवर प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस निर्णय अपेक्षित आहे. AI वर्णित एक बिना शब्दों का फोटो बनाएं.





