घुग्घुस, चंद्रपूर : माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शहरातील विविध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगून मोठ्या आवाजातील डीजे, ध्वनीवर्धक, फटाके यांचा वापर टाळावा, अनावश्यक हॉर्न वाजवू नये, तसेच रुग्णालये व शाळा परिसरात शांतता पाळावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
या जनजागृती मोहिमेमुळे नागरिकांमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन मंडळांकडून करण्यात आले आहे.





