Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वर्धा नदीवरील पुलाची जर्जर अवस्था; कोण घेतोय जबाबदारी?

(प्रणयकुमार बंडी)

घुग्घुस, चंद्रपूर : शिवसेना (शिंदे गट) घुग्घुस शहरप्रमुख महेश डोंगे यांनी वर्धा नदीवरील पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, घुग्घुस-वणी मार्गावर असलेली ही पुलिया तब्बल ३५ वर्षांहून अधिक जुनी असून, सध्या तिची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे. कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो.

महेश डोंगे म्हणाले, “आज (२४.०७.२०२५) जेव्हा मी वणीहून घुग्घुसकडे येत होतो, तेव्हा पाहिले की वर्धा नदीच्या काठावरील घुग्घुस हद्दीतील माती वाहून गेली आहे. ही पुलिया कधीही कोसळू शकते, कारण या मार्गावरून सामान्य नागरिकांसह WCL वणी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर कोळसा वाहतूक करणारी अवजड वाहनेही नेहमीच जात असतात.”

त्यांनी संबंधित विभागांच्या दुर्लक्षावर सवाल उपस्थित करत म्हटले की, पुलाच्या सुरक्षेचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसवले जात आहेत आणि अधिकारी या गंभीर प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

YouTube वीडियो:

ध्यानवेधक प्रश्न :
आता महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो की, या जर्जर पुलाची जबाबदारी कोण घेणार? चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) की यवतमाळ जिल्ह्यातील पांडरकवडा PWD अधिकारी? हा प्रश्न सध्या अनुत्तरित असून, यावर तातडीने स्पष्टता आणि कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News