घुग्घुस (चंद्रपूर) : ड्रीमलँड सिटी येथील गणेश मंदिरातून श्री गणेश जयंतीनिमित्त कलश यात्रा काढण्यात आली होती. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात कलश यात्रेत सहभागी भाविकांना शीतपेय वाटप करण्यात आले. तसेच सुखकर्ता गणेश मंदिर कमेटीचे अध्यक्ष सचिन राजूरकर व प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांच्या उपस्थितीत भजन मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपाचे साजन गोहने, सुचिता लुटे, बबलू सातपुते, सुनीता घिवे, रुंदा कोंगरे, रत्नदीप कोंडावार, मारोती मांढरे, श्रीकांत बहादूर आदी उपस्थित होते.