घुग्घूस, चंद्रपूर : येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, दि. २३ जून रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे नगरसेवक विवेक बोढे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कार्यकर्त्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक विवेक बोढे यांनी डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रसेवेसाठीच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले की, “देशाची एकता, अखंडता आणि जम्मू-काश्मीरच्या पूर्ण विलीनीकरणासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. त्यांचा त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि विचार आजही प्रत्येक भारतीयाला राष्ट्रसेवेची प्रेरणा देतात.”
कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. मुखर्जी यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.




