Saturday, June 27, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शिर्डी विधानसभा मतदारसंघात ३० जूनपासून विशेष सखोल पुनरीक्षण

मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

अहिल्यानगर : २१८ शिर्डी विधानसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जूनपासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देणार असून नागरिकांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २५ व २६ जून रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी माणिक आहेर व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. यादी भाग क्रमांकानुसार प्रशिक्षणाचे दोन स्वतंत्र सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले. प्रत्यक्ष उदाहरणे, प्रपत्र हाताळणी तसेच क्षेत्रीय अडचणींवर चर्चा करून अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान गणना प्रपत्रांचे घरपोच वितरण, त्यामध्ये अचूक व त्रुटीरहित माहिती भरण्याची पद्धत, पात्र मतदारांची माहिती संकलित करणे, पडताळणीची कार्यपद्धती, नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हा लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर १९ जून रोजी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होऊ नये, यासाठी अचूक व त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात आले.

या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. २० ते २९ जून या कालावधीत पूर्वतयारी, प्रशिक्षण व आवश्यक साहित्य छपाईची कामे पूर्ण करण्यात आली असून ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. तसेच २९ जुलैपर्यंत मतदान केंद्रांच्या यादीचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे.

५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचे निवारण ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येईल. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News