चंद्रपूर : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता तहसीलदार, नायब तहसीलदार कंत्राटी आहेत…, हे सगळं कोणासाठी आणि कारण काय?, कारण एकच गोष्ट… भाजपला आरक्षण संपवायचे आहे.
हे सगळं अंत्यत सुनियोजितपने केंद्र सरकार व त्यांच्या मातृसंस्थेच्या पुर्व नियोजनचा भाग आहे. कोणत्याही घटकाला आरक्षण देणार नाही असं म्हणायचं नाही. पण निर्णय अशे घ्यायचे की त्यांना आरक्षणाचा फायदा मिळूच नये.
नोकऱ्या संपवल्या जात आहेत. बेरोजगारांची फौज देशात तयार केली जातेय. त्यांना जाती,धर्म, आरक्षण आणि प्रादेशिक इत्यादी अस्मितेच्या मुद्यावर आपापसात लढवल जातंय.
पण काँग्रेस या देशाला कंत्राटी होऊ देणार नाही. काँग्रेसच सरकार आल्यावर हे सगळे निर्णय बदलणार. शासकीय नोकरीसाठी संघर्ष करून अभ्यास करणाऱ्या तरुणांचे स्वप्न काँग्रेस उध्वस्त होवू देणार नाही.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1707794658674331989?t=Ftc1rtAsWzBfMaT3gNPEGg&s=19

जळगाव येथील एका जाहिरातीनुसार :
(1) लवाद (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आणि जिल्हाधिकारी, जळगाव, (2) सक्षम अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, जळगाव विभाग, जळगाव, (3) सक्षम अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, भुसावळ विभाग, भुसावळ, (4) ) सक्षम प्राधिकारी व उपविभागीय अधिकारी, जळगाव अधिकारी, भुसावळ उपविभागीय अधिकारी, अमळनेर विभाग, अमळनेर (5) सक्षम अधिकारी व उपविभागीय अधिकारी, पाचोरा विभाग, पाचोरा आणि (6) सक्षम अधिकारी व उपविभागीय अधिकारी चाळीसगाव विभाग. पात्र सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि उमेदवारांना चाळीसगावच्या विविध कार्यालयांमध्ये ठराविक पदांसाठी मासिक मानधन आधारावर केवळ 6 महिन्यांच्या कालावधीसाठी (पहिले 3 महिने आणि आवश्यक असल्यास पुढील 3 महिने) खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून नियुक्त करणे. यासाठी, इच्छुक आणि पात्र सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि उमेदवारांकडून वैयक्तिकरित्या किंवा नोंदणीकृत पोस्टाने 29/09/2023 पर्यंत सकाळी 9.45 ते 13/10/2023 या कालावधीत 06.15 वाजेपर्यंत (शासकीय सुटी वगळता) अर्ज मागविण्यात आले आहेत.




