भंडारा : ग्रामीण भागातील मिळकत धारकांना सनद वाटप करून त्यांचे हक्क अधिकृतपणे प्रदान करण्यात आले. यावेळी सामान्य जनतेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे आणि भविष्यातही त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार विभागाचे राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी दिली.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात श्री. जयस्वाल यांनी उपस्थित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या सनदा वितरित केल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, हे सरकार सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असून, अशा योजना राबवून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कार्यक्रमात स्थानिक अधिकारी, लाभार्थी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती.




