Monday, June 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बालकांचे आरोग्य जपूया, पोलिओमुक्त घुग्घूस घडवूया : नगरपरिषदेचे आवाहन

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते पोलिओ डोस देऊन अभियानाचा शुभारंभ

घुग्घूस, चंद्रपुर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाअंतर्गत घुग्घूस शहरात रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के व उपनगराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या हस्ते शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे ‘जीवनाचे दोन थेंब’ पाजून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविली जात आहे. महाराष्ट्रात शेवटचा पोलिओचा रुग्ण सप्टेंबर 2010 मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नसून ही स्थिती कायम राखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या अभियानासाठी शहरातील प्रमुख चौक तसेच विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला ओरल पोलिओ व्हॅक्सीन (OPV)चे दोन थेंब देऊन पोलिओसारख्या गंभीर आजाराचे समूळ उच्चाटन करणे आणि देशाला कायम पोलिओमुक्त ठेवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी तसेच सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका यांनी पालकांना आवाहन केले की, “सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. बालकांचे आरोग्य जपूया आणि पोलिओमुक्त घुग्घूस घडवूया.”

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News