Monday, June 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

घुग्घुस, चंद्रपुर : घुग्घुस येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवारी (२८ जून) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे दूरदर्शनद्वारे सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विवेक बोढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहाने ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला. कार्यक्रमानंतर बोलताना नगरसेवक विवेक बोढे म्हणाले की, ‘मन की बात’ या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, सामाजिक उपक्रम आणि जनजागृती अभियानांची माहिती प्रत्येक बूथपर्यंत व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. नागरिकांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, समाजहिताचे संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यास या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

या प्रसंगी नगरसेवक विवेक बोढे यांच्यासह अजय लेंडे, हनुमान खडसे, सुनंदा लिहीतकर, खुशबू मेश्राम, स्नेहा देवतळे, उषा बोन्डे, रामदास बोन्डे तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News