देशातील विमान उड्डाणांवर गेल्या काही दिवसांपासून झालेल्या परिणामामुळे प्रवाशांच्या गैरसोयीवर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने पुढील दोन दिवसांसाठी विविध विभागांमध्ये एकूण ८९ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
मध्य रेल्वे विभागात पुणे–बेंगळुरू, पुणे–दिल्ली, मुंबई–दिल्ली यांसह विविध लोकप्रिय मार्गांवर १४ विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी ताण लक्षात घेऊन अतिरिक्त डब्यांचीही व्यवस्था केली जात आहे.
पश्चिम रेल्वे विभागात भिवानी–मुंबई, मुंबई–शकूरबस्ती यांसह इतर काही मार्गांवर ७ विशेष गाड्या धावणार आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे विभागानेही प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली असून चेरलापल्ली–शालीमार, सिकंदराबाद–चेन्नई एगमोर आणि हैदराबाद–मुंबई या मार्गांवर ३ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
अचानक वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेने केलेली ही अतिरिक्त व्यवस्था दूरगामी प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी ठरणार आहे. रेल्वेने प्रवाशांना अधिकृत वेबसाइट आणि हेल्पलाईनवरून वेळापत्रक व उपलब्धता तपासण्याचे आवाहन केले आहे.




