Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घूसमध्ये महापरिनिर्वाण दिनी काँग्रेसतर्फे बाबासाहेबांना आदरांजली

घुग्घूस, चंद्रपुर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर 2025) घुग्घूस शहर काँग्रेस कमिटी तर्फे शहर काँग्रेस कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर — भारतीय संविधानाचे शिल्पकार, शोषित-वंचितांचे तारणहार, महान मानवतावादी नेते” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात आली. बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव, सामाजिक न्यायासाठी केलेल्या लढ्याची आठवण, तसेच भारतीय संविधानातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवा काँग्रेस पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भावपूर्ण वातावरणात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News