चंद्रपूर – विजयक्रांती लॉयड्स मेटल अँड पॉवर कन्ट्रॅक्ट कामगार संघटनेच्या वतीने एक विशेष फलक अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 21 मे 2025 रोजी बुधवार, दुपारी 2:30 वाजता, लॉयड्स मेटल अँड एनर्जी लि. येथील परिसरात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विधी मंडळ पक्ष नेते, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते नव्याने स्थापन झालेल्या विजयक्रांती संघटनेच्या फलकाचे अनावरण होणार आहे. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व सर्व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्याध्यक्ष प्रवीण लांडगे, महासचिव अशफाक शेख, उपाध्यक्ष सतीश सोनारी, देवीदास फुलझेले व संघटनेच्या कार्यकारिणीने विशेष तयारी केली आहे.
या कार्यक्रमाबाबत पोलिस स्टेशन, घुग्घुस यांना अधिकृत माहिती देण्यात आली असून, त्यावर “RECEIVED” शिक्का दिनांक 19 मे 2025 रोजी उमटलेला आहे.