वर्धा – स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत नाकेबंदी करत एक मोठी कारवाई केली असून अवैधरित्या विदेशी दारू व बिअर वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत 5,31,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तात्काळ नाकेबंदी केली गेली. त्यावेळी काळ्या रंगाच्या स्कोडा कंपनीच्या (MH-03-BE-5982) कारमधून शुभम उर्फ शेरू कुमार उडवाणी (वय 24, रा. दयालनगर, वर्धा) हा विदेशी दारू व बिअरची वाहतूक करताना सापडला. वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये पुढील प्रमाणे विदेशी दारू व बिअर आढळून आली:
रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एमएलच्या 24 सीलबंद बाटल्या – किंमत 8,400/-, मेकडॉल नं.1 कंपनीच्या 180 एमएलच्या 24 सीलबंद बाटल्या – किंमत 8,400/-, बडवायझर मॅग्नम बिअरच्या 500 एमएलच्या 48 सीलबंद कॅन्स – किंमत 14,400/-, स्कोडा फेबिया कार – अंदाजे किंमत 5,00,000/-, एकूण मुद्देमालाची किंमत 5,31,200/- रुपये इतकी आहे. प्रारंभिक चौकशीत आरोपीने हा माल यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील … ट्रेडर्स बारमधून आणल्याचे कबूल केले आहे.
सदर प्रकरणी वर्धा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांचे पथक – पोउपनि बालाजी पालवाले, राहुल ईटेकर, पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, मनिष कांबळे, अमोल नगराळे, प्रफुल पूनवटकर (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) – यांनी संयुक्तपणे पार पाडली.
पोलिसांकडून या अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.