Monday, June 16, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

घुग्घुस (चंद्रपूर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती घुग्घुस येथील जनता गैरेज मित्र परिवारच्या वतीने सोमवार, १४ एप्रिल रोजी अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात जनता गैरेजचे संचालक आशीष वनकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी सामूहिक बुद्ध वंदना घेत आदरांजली वाहिली. कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जिवनकार्यावर आधारित भक्तिगीत सादर करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार आणि भोजन वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे आरोग्य समाजसेवक योगेश नासरे, माजी नकोडा ग्रामपंचायत उपसरपंच मोहम्मद अनिफ शेख, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते किशोर साधनकर, मरियम्मा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपती आरेली, ब्रिथ ऑफ लाइफ मल्टीपरर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रणयकुमार बंडी आदींची उपस्थिती होती.

तसेच, घुग्घुस पोलीस स्टेशनचे नव नियुक्त निरीक्षक प्रकाश राऊत, API सचिन तायवाडे, PSI गणेश अनबुले यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता आशीष मासिरकर यांनीही कार्यक्रमस्थळी सदिच्छा भेट देत सर्वांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमात अनेक मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इथे सर्वधर्म समभाव असा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन कांबले, रोशन बंडी, राजकुमार वर्मा, महेश डोंगे, सूरज मोरपाका, नीलेश कांबले, संजना डोरके, शारदा झाड़े, चेतन बोबाडे, चेतन कांबले, लखन वाघमारे, शंकर चव्हाण, बोनी बहादे, रिजवान अंसारी, सुरेश खडसे, शफी शेख, धीरज ढोके, अमित बोरकर, गणेश झाड़े, अनीस सिद्दीकी, शाहरुख शब्बीर पठान, अनमोल पाटिल, चन्द्रभान खड़सकर, हरीश चव्हाण, राकेश लांडगे, पिंटू कांबले, शम्मुद्दीन शेख, मोहम्मद शाहीर हनीफ शेख, रोहित केवट, गणेश आत्राम, चेतन पूसाठे, सुहास आगदारी, शरद कस्तूरी, सुरेश बत्तीनी, कवित साठे, सूर्यकांत कांबले, सर्वर खान, बंटी ज़ुम्नाके, प्रतीक नागरले, साहिल महाकुलकर, मारोती तोड़से, सोहम कामतवार, अखिलेश ख़ौसे, आशीष नालबोगा, रवि डोमा, मिनाज चव्हाण, अमरदीप सिंग, राकेश लांडगे, सागर कोंडागुरला, साहिल शेख, राजू खोबरागड़े, गुलाब लांबटकर, अंबाला, रोहित गोडुगु, विकी पाज़ारे, संजय झाड़े, प्रवीण कुमरवार, सनी कुमरवार, किरण पुरेल्ली आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सामाजिक समतेचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार या कार्यक्रमातून दाखविण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News