घुग्घुस (चंद्रपुर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त घुग्घुस येथील मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने सोमवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी नायब तहसीलदार कार्यालयासमोर शीतपेयाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते शीतपेय वाटप करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाज बांधवांनी अभूतपूर्व उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नितु चौधरी, जिल्हा सचिव विनोद चौधरी, सिनू इसारप, चिन्नजी नलभोगा, सचिन कोंडावार, सुरेंद्र जोगी, असगर खान, हेमंत कुमार, इर्शाद कुरेशी, प्रमोद भोस्कर, रोशन अतकारे, किशोर जाधव, सुनंदा लिहीतकर, ज्योती काळे, रमाबाई कोंडावार, संदीप तेलंग, हनुमान खडसे, उमेश दडमल आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला सामाजिक सेवाभावाची जोड मिळाली.




