Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी नवीन मिनी रेस्क्यू टेंडर वाहनांची वाढ

 

पालघर: राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बळकटीकरणासाठी पालघर आणि डहाणू नगर परिषदेसाठी मिनी रेस्क्यू टेंडर वाहने प्रदान करण्यात आली आहेत.

डहाणू आणि पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलात ही वाहने दाखल झाल्यामुळे त्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधिक वाढली आहे. या वाहनांच्या मदतीने अग्निशमन दल आणखी सक्षम होईल आणि नैसर्गिक आपत्ती तसेच इतर आपत्कालीन घटनांमध्ये वेगवान मदतकार्य करता येईल.

या नवीन मिनी रेस्क्यू टेंडर वाहनांचे लोकार्पण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला विविध अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना तातडीने मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतआहे.

 

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News