Saturday, July 4, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जंगलातील वणवा प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी एनएफएससी आणि सीएफएमध्ये सामंजस्य करार

नागपूर – जंगलातील वणवा प्रतिबंधक उपाययोजना आणि व्यवस्थापन धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), नागपूर आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी (सीएफए), चंद्रपूर यांच्यात काल महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.

एनएफएससीचे संचालक एन.बी.शिंगणे आणि सीएफएचे संचालक एम.श्रीनिवास रेड्डी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थांमध्ये जंगलातील वणवा प्रतिबंध, व्यवस्थापन आणि तात्काळ प्रतिसाद यासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास आणि संशोधनाला गती देण्यात येणार आहे.

एनएफएससीचे संचालक एन.बी. शिंगणे यांनी सांगितले की, “जंगलातील वणवा रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि योग्य धोरणे यांची गरज आहे. या करारामुळे दोन्ही संस्थांना परस्पर सहकार्याच्या माध्यमातून या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल.”

सीएफएचे संचालक एम.श्रीनिवास रेड्डी यांनीही हा करार जंगल संरक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल, असे मत व्यक्त केले. या सहयोगामुळे वणवा व्यवस्थापनासाठी नवीन संशोधन आणि तांत्रिक सहकार्य वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News