गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात (मंगळवार) झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. शहीद जवानाचे नाव महेश नागुलवार असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या जोरदार चकमकीत महेश नागुलवार यांनी वीरमरण पत्करले. या चकमकीदरम्यान पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला.
घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली असून, परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीवर आघात करण्यासाठी सुरक्षा दलांनी हालचाली वेगवान केल्या आहेत.




