पालघर : पोलिस दलासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेल्या महाराष्ट्रातील 39 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पालघर पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पालघर आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपअधीक्षक अनिल लक्ष्मण लाड आणि स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बाबुराव वानखेडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
यासोबतच, महाराष्ट्र राज्यातील ४ अधिकाऱ्यांना विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ही कामगिरी फक्त पालघरच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी कौतुकास्पद बाब ठरली आहे.




