कलियुगानुसार ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना! – दीपाली सिंगाभट्टी, सनातन संस्था
चंद्रपूर : अनेकजण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून मिळणार्या सुखालाच आनंद समजतात; मात्र खरा आनंद हा अध्यात्माचे आचरण केल्यानेच प्राप्त होतो. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘साधना’ करणे आवश्यक असते. सध्याच्या कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या दीपाली सिंगाभट्टी यांनी साधना प्रवचनाच्या वेळी उपस्थित जिज्ञासूंना केले.
घुग्घुस येथील प्रयास सभागृहात दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी या साधना प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाचा लाभ १६० जिज्ञासूंनी घेतला. प्रवचनादरम्यान सिंगाभट्टी यांनी साधनेचे विविध मार्ग, कलियुगात योग्य साधना कोणती असावी, कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.




