चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना स्वत: भेट घेऊन त्यांची अनेक समस्या जाणुन घेतली. समस्यांचा तर भंडार चंद्रपूर विधानसभा क्षेत्रा मध्ये आढळून आला. कुठे रस्ते नाहीत, कुठे नाल्या नाहीत तर कुठे नाल्या मध्ये कपडे धुणे करुन मतदार आपला उध्दर निर्वाह करत आहे, कुणाचा मुलगा सहा महिन्यापासून हरवला आहे त्यांना कुणाची साथ मिळाली नाही, तर कुणाचा वडीलाचे दु:खत निधन झाले ते आपला कसेबसे उध्दर निर्वाह चालवित आहेत, शेतकरी बांधवांना पिकांना योग्य भाव मिळत नाहीत असे शेतकरी बांधवांनी आपले मत मांडून वेथा व्यक्त केली तर युवा मुल, मुली शिक्षित असुन त्यांच्या हाताला काम नाही. असा अनेक समस्या चंद्रपूर विधानसभा मध्ये आढळून आल्या. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार सुरेश मल्हारी पाईकराव यांनी त्यांना त्यांच्या समस्यांवर उत्तर देत सांगितले की आपण डोळे झाकून असा नेत्याला निवडुण देतो जो आपल्या कामी येणार नाही हे माहीत असुन सुद्धा आपण तेच चुका करत आलो आहोत. आजपर्यंत आपण आमदार, खासदार, सभापती असा अनेक लोकांना निवडून दिले. परंतु त्यांनी कधी आपली समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुध्दा कधी केला नाहीत.
सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगार आणि शेतकऱ्यांचा पिकांना भाव नाही. आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये अनेक समस्या आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे. GR पगार लागु आहे परंतु ज्या लोकांना आपण निवडून पाठविले आहे. ते कधीतरी या विषयावरती बोलत सुध्दा नाहीत. कारण या सर्व कंपनी मध्ये याच लोकांचे ठेके चालु आहेत. आणि आपण याच लोकांना निवडून देतो. ठेकेदारी पध्दत बंद झाली पाहिजे आणि आपले भाऊ बंधु हे पर्मनंट झाले पाहिजे. म्हणुन आपल्याला एक संधी आली आहे. फक्त एक संधी द्या या सर्व समस्यावर योग्य न्याय मी मिळवुन देऊ असे आश्वासन दिले. आणि सर्व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन पाईकराव यांना एक संधी आता आम्ही तुम्हाला देऊ असा सुध्दा आशिर्वाद मिळाला.




