पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन
अमरावती : बडनेरा-37 विधानसभा मतदार संघातील उमेदवार यांना नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. बडनेरा-37 विधानसभा मतदार संघाचे नामांकन अर्ज जुने तहसिल कार्यालय, मुख्य पोस्ट ऑफीस जवळ, अमरावती या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे. या कार्यालया समोरील मार्ग अत्यंत गजबजलेला असतो. ही बाब लक्षात घेता या दिवशी शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिली आहे.
तात्पुरत्या अधिसूचनेनुसार यादिवशी मुख्य पोस्ट ऑफीस, अमरावती ते तहसील कार्यालयाच्या भिंती पावेतो येणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग याप्रमाणे :
वाहन चालकांनी श्याम चौक ते साबनपुरा व बापट चौक ते जवाहर गेटकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करतील.
मुख्य पोस्ट ऑफीस, अमरावती ते तहसील कार्यालय या मार्गावरील आस्थापनाधारकांनी आपली वाहने सकाळी 10 वाजेपूर्वी आस्थापनाकरीता आरक्षित पार्कींगमध्ये ठेवावी. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान प्रवेश बंदी असलेल्या मार्गावरून आपणास वाहन ने-आण करता येणार नाही. या कालावधीत आपणास वाहनाचे काम असल्यास आपण प्रतिबंधित मार्गाच्या बाहेर आपली वाहने अन्य सुरक्षित ठिकाणी पार्क करावी.
या अधिसूचनांचे जो कोणी वाहनचालक उल्लंघन करेल, त्यांचेविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे कायेदशीर कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.