अमरावती : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एनएसएस हॉल, अमरावती येथे गुरुवार, दि. 26 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळावामध्ये नागपूर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भरती मेळाव्यासाठी जास्तीत-जास्त आयटीआय मोटर मेकॅनिक, डीजल मेकॅनिक आणि इलेक्ट्रिशियन व्यवसाय उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी होवून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे. प्रशिक्षणार्थी यांनी बायोडाटा व मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
अमरावती शासकीय औेद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे गुरुवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com