Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जुगार अड्यावर छापा टाकून आलीशान महागड्या वाहनासह एकूण 50,15,860 रूपयाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचेकडून गिरड हद्दीतील रेड

गिरड (वर्धा) : जुगार अड्याबाबत गिरड हद्दीतील अशोक गड्डमवार हा त्याचे साथीदारसह गिरड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जुगार भरवित असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना मुखबिरकडून खात्रीशीर माहीती मिळताच दि. 23/09/24 ते 24/09/24 चे रात्र दरम्यान रात्रभर पाळत ठेवून हालचालीवर लक्ष ठेवुन वेगवेगळी पथक तयार करुन सापळा रचुन मौजा फरीदपूर येथीन शेतातील बंडयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिम ने जुगार अड्डयावर चारही बाजुने घेराव करुन छापा घातला असता जुगार अड्डयावर जुगार खेळतांना 52 तास पत्यावर पैशे लावून हारजीतचा खेळ खेळतांना मिळुन आल्याने ताब्यातुन जुगाराचे नगदी 2,16,860/- रु., 22 मोबाईल 3,04,000/-रु., 6 चारचाकी वाहन व 6 दुचाकी वाहने किंमत 44,95,000/- रु. असा एकुण 50,15,860/-रु. चा मुद्येमाल जप्त करुन आरोपींना सदर जुगार अड्ड्याबाबत सखोल विचारपूस केली असता सदर जुगार अड्डा हा गिरड येथे राहणारा अशोक गड्डमवार, हा त्याचे साथीदार विशाल बहादूरें रा. धोंडगाव, विलास लभाने रा. गिरड तसेच शेत मालक सुधिर धानोरे रा. फरिदपुर यांनी संगनमताने 52 तास पत्त्यावर मांग पत्याच्या जुगारावर पैश्याची बाजी लावून स्वताचे आर्थिक फायदया करीता जुगार भरविलेला आहे. असे एकुण 28 आरोपी विरुध्द जुगार कायद्यान्वये पोलीस स्टेशन गिरड येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News