अमरावती : वाळू रेती निर्गती सुधारित धोरण, वाळू, रेती उत्खनन मार्गदर्शक सूचना तसेच वेळोवेळी निर्गमित झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार जिल्ह्यातील रेतीघाटांचे सर्वेक्षण करून एकूण 33 रेतीघाट तालुकास्तरीय संनियंत्रण समितीने रेती उत्खननासाठी योग्य असल्याचे अहवाल जिल्हा खनिकर्म कार्यालयास सादर केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील रेती उत्खननासाठी योग्य असलेल्या रेतीघाटांचे तपशिलाचा समावेश करुन वर्ष 2024-25 च्या सुधारणेसह अद्यावत करण्यात आलेला आहे. जिल्हा सर्वेक्षण अहवालाची सुधारित आवृत्ती सर्व जनतेचे अवलोकनार्थ तसेच अभिप्राय/सूचना (Comment) प्राप्तीसाठी www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपले अभिप्राय,/सूचना/आक्षेप//तक्रार/निवेदन ठराव इत्यादी असल्यास त्या लेखी स्वरुपात जिल्हा वाळू संनियंत्रण समिती खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किंवा dmoamravati1@gmail.com या ई-मेल आयडीवर सदर जाहीर सूचनेच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी केले आहे.