-युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार
ब्रम्हपूरी येथे विदर्भस्तरीय दहीहंडी उत्सव साजरा
चंद्रपूर : सर्वत्र गोकुळाष्टमीची धामधुम सुरू असुन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे विधानसभा क्षेत्रात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवात पुढाकार घेऊन नागरिकांचे प्रोत्साहन वाढवत नागरिकांच्या जल्लोषात तन, मन, धनाने सहभागी होत असतात. यावर्षीचा गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्राची सुसंस्कृती व परंपरा गोपालांनी कायम जोपासावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपूरी क्रिडा व सांस्कृतिक समीतीच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान किरसान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, कृउबा संचालक किशोर राऊत, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, युवा नेतृत्व निनाद गडे, माजी नगरसेवक जगदीश आमले, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डि.के.मेश्राम, कृउबा माजी संचालक सुरेश दर्वे, वैद्यकीय अधिकारी डॉ श्रिकांत कामडी, प्रिन्स नंदुरकर, अतुल राऊत, अॅड आशिष गोंडाणे, शुभम कावळे, अमोल ठेंगरी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रपूर, भंडारा, नागपूर जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी या दहीहंडी मध्ये सहभाग दर्शविला होता. गोविंदांनी रिंगणात तयार केलेले चित्तथरारक मानवी मनोरे बघण्यासाठी नागरिकांनी खुप मोठ्या गर्दी केली होती.
यामध्ये स्पर्धेचा प्रथम पारितोषिक महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून ७७,७७७ रुपयांचा पारितोषिक आदीशक्ती गृप भंडाराने पटकावला. तर द्वितीय पारितोषिक जिल्हा काॅंग्रेसचे सचिव विलास विखार यांच्या कडून ३३,३३३ रूपयांचा पारितोषिक जय महाकाल गृप भंडाराने पटकावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोंटु पिलारे व सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले. तर आभार राहुल उराडे यांनी मानले.