परभणी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या पत्रान्वये सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. सदरील लोकअदालतीमध्ये पक्षकार, स्टेकहोल्डर प्रत्यक्ष किंवा अभासी प्रणालीद्वारे सहभाग घेवु शकतात. ज्या पक्षकार, स्टेकहोल्डर यांची प्रकरणे प्रलंबित असुन तडजोडीने मिटवण्याची इच्छा असल्यास याबाबत त्यांनी त्यांच्या सेवा विधीज्ञांशी संपर्क करावा व अधिक माहितीसाठी संबंधित राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांनी केले आहे.
विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com