Sunday, May 3, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त खिरदान व बुद्ध वंदना कार्यक्रम उत्साहात

घुग्घुस, चंद्रपुर : जेतवन महाबोधी बुद्ध विहार, आंबेडकर नगर, शास्त्रीनगर, घुग्घुस येथे दिनांक १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त महिला मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रद्धाभावाने खिरदान करण्यात आले.

सकाळी १० वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली. उपस्थितांनी भगवान बुद्धांच्या शिकवणींचे स्मरण करत शांतता, करुणा आणि समतेचा संदेश दिला. कार्यक्रमात महिला मंडळाच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

या प्रसंगी कुसुम धोटे, लक्ष्मी पतंगे, प्रणाली घोनमोडे, नर्मदा वाघमारे, शितल भगत, वनिता जगताप, पुष्पा मुंजेवार, प्रार्थना मुंजेवार, शुभांगी चांदेकर, पंचफुलाबाई, पद्मा तलारी, पार्वता बाई, आम्रपाली, किरण मुंजेवार, बालाजी पतंगे, ताराचंद काटकर, राजू मुंजेवार, संजय वनकर यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाने धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, समाजात एकात्मता व बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News