परभणी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी राज्य शासनातर्फे अर्थसहाय्य करण्यात येते. उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाखापर्यंत कर्जमर्यादा आहे. सदर योजनेअंतर्गत पुरुषांसाठी 15 ते 25% पर्यंत व महिलांसाठी 25 ते 35 टक्के पर्यंत अनुदानाची मर्यादा आहे. सन 2024-25 साठी जिल्हा उद्योग केंद्रास 1200 कर्जप्रस्तावांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. जिल्ह्यातील गरजू व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.
सुशिक्षित बेरोजगारांकडून कर्ज प्रस्तावासाठी अर्ज आमंत्रित
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com