मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेत पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर तसेच दिवंगत माजी सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव सभागृहात मांडला.
यावेळी पद्मविभूषण आशा भोसले आणि पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच माजी विधानपरिषद सदस्य दिवंगत प्रा. भाऊराव तुळशीरामजी देशमुख आणि सुरेशकुमार कन्हैय्यालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दलही सभागृहात शोक व्यक्त करण्यात आला.
सभागृहातील सदस्यांनी दिवंगत व्यक्तींच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर दिवंगतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही काळ मौन पाळण्यात आले.




