Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) मार्फत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या महामंडळाचा मुख्य उद्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास जातींतील नागरिकांचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण करणे हा आहे.

महामंडळाच्या योजनांमधून विविध स्वरूपाचे कर्ज दिले जाते, ज्यामुळे या घटकांतील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते तसेच आर्थिक स्वावलंबन प्राप्त करता येते. महामंडळाच्या विविध योजनांद्वारे शेतकरी, लघुउद्योग चालक, शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच छोट्या व्यावसायिकांना मदत केली जाते.

राज्यातील गरजू लाभार्थ्यांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित जिल्हा कार्यालयांमध्ये संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.)

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News