धुळे: शहरात बेकायदेशीररित्या चालविल्या जाणाऱ्या लॉजेस आणि कॅफेवर आज मोठी कारवाई करण्यात आली. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही धडक कारवाई करत छापे टाकले आणि संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली.
पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून अनधिकृतपणे चालणाऱ्या लॉज आणि कॅफेंची तपासणी केली. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले असून काही आस्थापनांवर सील ठोकण्यात आले आहे.
यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, “शहरात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या व्यवसायांमुळे गैरप्रकार वाढत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलून ही मोहीम राबविल्याबद्दल त्यांचे आभार.”
या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत व्यवसायांवर दडपण वाढले असून, भविष्यात अशा बेकायदेशीर धंद्यांना आळा बसण्याची शक्यता आहे. तसेच, पोलिस प्रशासनाने नागरिकांना अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती तातडीने कळवण्याचे आवाहन केले आहे.




