चंद्रपुर : महाराष्ट्र सरकारने राज्याच्या विकासासाठी तयार केलेल्या रोड मॅपच्या पहिल्या 100 दिवसांच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ जलद आणि वेळेत मिळावा, यासाठी सात कलमी कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या ध्येयधोरणांची माहिती आणि यश तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी नागपूर-अमरावती विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रसारमाध्यमांना धोरणांच्या व्यापक प्रसारासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे, अंमलबजावणीत गती आणणे, आणि लोककल्याणकारी धोरणांचे फायदे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.




