Friday, June 5, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आमदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

घुग्घुस, चंद्रपूर : येथील आमदार सेवा केंद्रातर्फे गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी भाजपाचे नगरसेवक विवेक बोढे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनीही पुष्प अर्पण करत महाराजांना आदरांजली वाहिली.

मनोगत व्यक्त करताना विवेक बोढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरायांचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि सुशासनाचा आदर्श प्रत्येक पिढीने स्मरणात ठेवावा. रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे आणि उत्तम प्रशासन देणारे जाणते राजे म्हणून शिवाजी महाराजांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या विचारांचा आणि शौर्याचा संदेश घराघरांत पोहोचवणे हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपाचे अमोल थेरे, बबलू सातपुते, गणेश कुटेमाटे, वैशाली ढवस, नितू चौधरी, सुरेंद्र भोंगळे, मिलिंद पानघाटे, सचिन राजूरकर, उमेश दडमल, हेमराज बोमले, तुलसीदास ढवस, हेमंत कुमार, सचिन नांदे, मानस सिंग, कोमल ठाकरे, सुरेंद्र जोगी, असगर खान, अतुल चोखांद्रे, गणेश राजूरकर, सुनील ब्रम्हे, हनुमान खडसे, सुनंदा लिहीतकर आदी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News