Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

ध्वनी व वायू प्रदूषण कमी करा, अन्यथा आंदोलन — शिवसेना (उ.बा.ठा.)

चंद्रपुर : घुग्घुस शहरातील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या पॉवर प्लांटमधून होत असलेला प्रचंड आवाज तसेच अति वायू प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातत्याने सुरू असलेल्या या ध्वनी व वायू प्रदूषणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून, आजारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

कंपनीच्या अवघ्या १०० मीटर परिसरातच गावातील शासकीय दवाखाना असून, तेथे दररोज गर्भवती महिला व इतर रुग्ण उपचारासाठी येतात. पॉवर प्लांटमधून होणाऱ्या प्रचंड आवाज व प्रदूषणामुळे गर्भवती महिला व नवजात बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे नवजात बालकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

या गंभीर बाबींची दखल घेऊन तात्काळ ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रणात आणावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या ७ दिवसांच्या आत प्रदूषण कमी करण्यात आले नाही, तर कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उ.बा.ठा.) तर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर येथे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या वेळी शहर अध्यक्ष हेमराज बावणे, शहर संघटक अमित बोरकर, तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News